व्हिडीओ – उपमुख्यमंत्री अजितदादांच्या काटेवाडीत बिबट्याची ‘दादा’गिरी 

बारामती : एमआयडीसी परिसरात वावर असलेल्या बिबट्याने आता बारामती तालुक्यातल्या काटेवाडी, कन्हेरी परिसरात दहशत माजवली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, काल सायंकाळी या बिबट्याने मेंढ्याच्या कळपावर हल्ला केल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याने हल्ला केल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या मेंढपाळांनी धाडस दाखवत बिबट्याचा पाठलाग केल्यानं हल्ला केलेल्या मेंढीचा जीव वाचला असला तरी या हल्ल्यात मेंढी गंभीर जखमी झाली आहे. बिबट्याचा काटेवाडी कण्हेरी परिसरात वावर आसल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

याबाबत हल्ला झालेल्या मेंढयांच्या कळपातील प्रत्यक्षदर्शी मेंढपाळांसोबत दैनिक प्रभातचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी संवाद साधला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here