श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील सराला गोवर्धन माळेवाडी रस्त्यावर मोटारसायकलवर जात असलेल्या तरुणास बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सराला गोवर्धन माळेवाडी रस्त्यावरुन मोटारसायकलवर जात असलेला विजय नारायण विटेकर याच्यावर रात्री 8 च्या सुमारास बिबट्याने झडप घालून पंजा मारुन गंभीर जखमी केले. बिबट्याने दुचाकीवर झडप घातली तेव्हा दुचाकी खाली पडून जोरात रेस झाल्याने बिबट्या अंधारात पळाला आणि विजयचा जीव वाचला. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
घरात घुसलेल्या बिबट्याला कुत्र्याने हुसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद
घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा करुन जखमी विजय विटेकर याची माहिती घेतली. यावेळी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच सोपान औताडे, सोमनाथ औताडे, माऊली वेताळ, शिवाजी विटेकर, पद्मनाथ वाघमारे, पत्रकार दादासाहेब जगताप यांनी केली. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
जेऊर बायजाबाई येथेही बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रे ठार
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रे ठार झाले आहे. दरम्यान, वनविभाने घटनेची माहिती समजताच घटनास्थळी भेट देत हा हल्ला बिबट्यानेच केल्याची पुष्टी केली आहे.