लियोनार्डोची “एक्‍झिट’

हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता लियोनार्डो डिकेप्रियो हा अभिनयाबराबेरच पर्यावरणप्रेमी म्हणूनही ख्यातनाम आहे. सध्या त्याची भारतातही चर्चा आहे. याचे कारण म्हणजे कावेरी कॉलिंग आंदोलन. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या आंदोलनाचा उद्देश कावेरी नदीचे संवर्धन, संरक्षण करणे आणि नदीक्षेत्रातील जैवविविधतेचे रक्षण करणे हा होता.

या आंदोलनासाठी लियोनार्डोने आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली होती. तथापि, काही पर्यावरणवाद्यांना ते रुचले नाही. त्यांनी यामध्ये खोडा घातला. लियोला या आंदोलनात सहभागी करून घेण्यास त्यांनी नकार दिला.

वास्तविक, हे आंदोलन योग्य प्रकारे चालवले जात नसल्याची चर्चा होती. त्यामुळेच की काय आता लियोनार्डोने मदत देण्यापासून हात आखडता घेतला आहे. भारतातील सामाजिक समस्यांची आणि समाजकारणाची गुंतागुंत चित्रपटांच्या रिळांपेक्षाही किती जटिल आहे याची प्रचिती यानिमित्ताने लियोला आली असल्यास नवल नाही!

Leave A Reply

Your email address will not be published.