नवी दिल्ली – भारताचा अव्वल बुद्धिबळपटू व आंतरराष्ट्रीय मास्टर लायन मेंडोसा याने हंगेरी बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याबरोबरच मेंडोसाने ग्रॅंडमास्टर किताबाचा दुसरा टप्पा पार केला.
आता ग्रॅंडमास्टर किताबावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मेंडोसाला तिसरा टप्पाही यशस्वीरीत्या पार करावा लागणार आहे. मेंडोसाचे 2516 एलो गुण झाले आहेत.
हंगेरी स्पर्धा त्याने 7.5 गुणाच्या जोवार जिंकत किताबाच्या दीशेने यशस्वी वाटचाल केली असून या स्पर्धेत त्याने हंगेरीचा ग्रॅंडमास्टर फोगरासीला पराभूत करत स्पर्धेतील सर्वात धक्कादायक विजय प्राप्त केला होता. हाच सामना स्पर्धेतील मेंडोसाचे वर्चस्व सिद्ध करणारा ठरला होता.