लेहला उणे 14.4 तापमान

जम्मू काश्‍मीरातील थंडीचा कडाका वाढला

जम्मू : जम्मू काश्‍मीरातील थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणचा पारा शुन्याच्या खाली गेला आहे. आज सोमवारी लेहला उणे 14.4 इतके नीचांकी तापमान नोंदवले गेले होते.

राजधानी श्रीनगरचे तापमान उणे 2.5 तर उत्तर काश्‍मीरातल्या गुलमर्गचे तापमान उणे 7 अंश सेल्सीयस इतके नोंदवले गेले आहे. पेहलगाम या पर्यटन स्थळाचे सध्याचे तापमान उणे 5.8 इतके आहे.

उत्तर काश्‍मीरातील कुपवाडा येथील थंडीचा कडाकाही वाढला असून तेथील तापमानही उणे 3.7 इतके खाली आले आहे. या तुलनेत जम्मूत मात्र स्थिती बरी आहे.

तेथील तापमानाने अजून शुन्याच्या खालची पातळी गाठलेली नाही. तेथील तापमान 8 अंश सेल्सीयस इतके आहे. वैष्णवदेवीच्या पायथ्याशी असलेल्या कटराचे तापमानही अजून सुसह्य म्हणजे 7 अंश सेल्सीयस इतके आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.