मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे सदस्य धनंजय मुंडे विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेची पोटनिवडणूक 24 जानेवारीला होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 10 ऑक्टोबरला धनंजय मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर 24 जानेवारीला मतदान होणार आहे. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून मुंडेंचा कार्यकाळ 7 जुलै 2022 पर्यंत होता.
आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुक वेळापत्रकानुसार 14 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होईल. 15 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची तपासणी करण्यात येईल. तर 17 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.
24 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार असून त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीच्या करण्यात येईल.