पुणे -लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती जाहीर केली.
लेफ्टनंट जनरल डॉ. कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (मेडिकल) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
त्यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी प्राप्त केली आहे. 2017 ते 2019 या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.