बुधवार, नटराज चौकात “एलईडी’ सिग्नल

पुणे – हैदराबादच्या धर्तीवर शहरातील झेब्रा क्रॉसिंगवर “एलईडी’ रिफ्लेक्‍टर बसवून सिग्नल यंत्रणा हाताळण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बुधवार चौक (हुतात्मा चौक) आणि डेक्‍कन परिसरातील नटराज चौक येथे बसविण्यात येणार आहे. पुढील आठवड्यामध्ये याबाबतचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त पंकज देशमुख यांनी दिली.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिसांकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. हेल्मेटसक्‍ती, जगजागृती, नियम पाळणाऱ्यास गिफ्ट व्हाऊचर आदी प्रयोग वाहतूक शाखेकडून राबविण्यात येत आहेत. यामध्ये आता अनोख्या “एलईडी’ सिग्नल यंत्रणेची भर पडणार आहे.

हैदराबादच्या केबीआर पार्क जंक्‍शन चौकामध्ये नुकताच डिजिटल पद्धतीच्या सिग्नल यंत्रणेचा प्रयोग करण्यात आला. या यंत्रणेचा वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांना फायदा होणार आहे. सध्याच्या सिग्नलप्रमाणेच ठराविक सेकंदाने या रिफ्लेक्‍टरच्या एलईडीचा रंग आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी याचा मोठा फायदा होतो. या पार्श्‍वभूमीवर शहर वाहतूक शाखेने हैदराबाद येथील अधिकाऱ्यांशी सिग्नल यंत्रणेबाबत संपर्क साधला होता. ही यंत्रणा पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम आणि उपायुक्‍त पंकज देशमुख यांच्या प्रयत्नातून राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)