महाराष्ट्रातील सर्व बोर्डाच्या शाळांना मराठी शिकविणे बंधनकारक- मुख्यमंत्री

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत मराठी भाषेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मराठी शिकविणे हे सगळ्यांसाठी बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आयसीएसई आणि सीबीए बोर्डाच्या शाळांमध्ये देखील मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असून त्यासाठी कठोर कायदा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोमवारपासून पावसाळी अधिवेश सुरू झालं आहे. दरम्यान, राज्यसरकार विविध योजना राबवत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी २४ जूनला आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. हा मुद्दा शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केला उपस्थित केला.

यावर मुख्यमंत्री म्हणाले, काही शाळा मराठी शिकवण बंधनकारक असले तरी त्याचे पालन करत नाहीत. खास करून आयसीएसई आणि सीबीए बोर्डाच्या शाळा. हे माझ्या लक्षात आले असून यासाठी कायद्यात बदल करून कठोर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रात मराठी शिकणे हे सगळ्यांसाठी बंधनकारक राहील.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.