मोदींसारखे खोटे बोलायला शिका; कॉंग्रेसचे टीकास्त्र

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा स्पष्टपणे खोटे बोलत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. ‘मोदींसारखे स्पष्टपणे खोटे बोलायला शिका’ या टॅगलाईनखाली क्रॅश कोर्स जाहीर केला आहे. तसेच काँग्रेसने ट्वीटद्वारे तीन स्टेपमध्येच भारतातील सर्वात मोठा खोटारडा कसे बनता येईल याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काँग्रेसने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्या भाषणाचे व्हिडिओ वापरण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये मोदींसारखे खोटे कसे बोलाल, असा क्रॅश कोर्स असल्याचे म्हटले आहे. पहिल्या स्टेपमध्ये आरशासमोर उभे राहण्यास सांगितले आहे. यानंतर मोदी खोटे कसे बोलतात याचा व्हिडिओ दाखविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.