-पाणी पिण्यास विसरू नका. पाण्याव्यतिरिक्त इतर पेये पिण्यावर नियंत्रण आणा. या पेयांमुळे शरीरात जाणार्या कॅलरीजची संख्या वाढते आणि परिणामी वजनही वाढते.
-भाज्यांचा रस, सूप यांचा आहारात समावेश करा. कधीतरी गोड खाण्यास हरकत नाही. मात्र त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. अशा पदार्थांमध्ये अॅडेड सुगर मोठ्या प्रमाणात असते.
-नीट बसून खा. घाईघाईत खाल्ल्यास ब-याचदा जरुरीपेक्षा जास्त अन्न पोटात जाते. खातेवेळी टीव्ही बघणे, वाचणे टाळा. त्यामुळे खाण्याकडे दुर्लक्ष होते.
-भोजनमध्ये हृदयासाठी चांगल्या असणा-या पदार्थांचा समावेश करा. जेवणाची चव चांगली असणे महत्त्वाचे आहेच, मात्र त्यासाठी त्यातील फॅट्स वाढवणे मुळीच चांगले नाही.
-सायीच्या दुधाऐवजी साधे दूध प्या. चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी मसाले वापरा. सॅच्युरेटेड फॅट्स खाण्यापेक्षा भाज्यांमधून मिळणारे फॅट्स खा.
-स्वयंपाकघरातील सगळे जंक फूड बाहेर काढा आणि तेथे कर्बोदके असणारी पेये आणि फायबर-रिच बिस्किटे, ताजा रस यांसारखे निरोगी रेडी-टु-ईट पदार्थ ठेवा. तुम्ही दररोज काय खाता याची नोंद ठेवा.
-वेळी-अवेळी खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. दररोज रात्री तुम्ही दिवसभरात काय खाल्ले यावर एक नजर टाका. त्यातील किती पदार्थ खाणे खरेच गरजेचे होते हे स्वत:लाच विचारा.