नवी दिल्ली – इंटरनेटवरील प्रायव्हसी हा आजघडीला सर्वाधिक चचिर्ला जाणारा मुद्दा आहे. अगदी सोशल नेटवकिर्ंगपासून देशातील राजकारण्यांपर्यंत सारेच जण या मुद्यावरून बोंबाबोंब करत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता फेसबुकने आपल्या युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी नवा पवित्रा हाती घेतला आहे.
फेसबुकने मेसेंजरसाठी एक नवीन फीचर्स लॉन्च केले असून, या फीचर्सच्या मदतीने युजर्सचे खाजगी मेसेजेस इतर कोणालाही पाहता येणार नाहीत. त्यामुळे तुमचे चॅट सुरक्षित राहण्यास नक्कीच मदत होईल. नव्या फिचरमुळे तुम्ही फेस आणि टच आयडीने अॅप अनलॉक करु शकाल.
दरम्यान, या संदर्भात फेसबुकच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक पोस्ट सुद्धा शेअर करण्यात आली आहे.
Messenger Introduces App Lock and New Privacy Settings https://t.co/SVV0nHrg17
— Facebook Newsroom (@fbnewsroom) July 22, 2020
फेसबुकने म्हंटले कि, “मेसेंजरमध्ये प्रायव्हसी सर्वात महत्त्वाची आहे. तिथे तुमचे मेसेज, व्हिडिओ चॅट, कॉल्स आणि मेसेंजर रुम सुरक्षित असेल. विशेष म्हणजे तुमचा टच आणि फेस आयडी फेसबुककडे स्टोर राहणार नाही किंवा तो कोठेही ट्रान्समिट करण्यात येणार नाही. हे फिचर सध्या आयफोन आणि आयपॅडमध्ये उपलब्ध असून काही महिन्यातच अॅनरॉईडवर उपलब्ध करण्यात येईल.