जाणून घ्या, फणस खाण्याचे फायदे

मोठ्या आकाराचे फळ म्हणजे फणस. कोकणात आंबे आणि फणस मुबलक प्रमाणात असतात. बाहेरून काटेरी आणि आतून गोड सर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस, अशी फणसाची ओळख. हे असे फळ आहे, ज्याचा भाजी म्हणून देखील उपयोग होतो. फणसात व्हिटॅमिन ए, सी, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह मोठ्या प्रमाणात असतात. फणस हे आपण कच्चं किंवा पिकलेलं देखील खाऊ शकतो.

1. फणसामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. यात कॅलरी खूप कमी असतात. याशिवाय फणसात अधिक प्रमाणात प्रोटीन देखील असतात. हे खाल्ल्यास बराच वेळ भूक देखील लागत नाही.
2. फणसात व्हिटॅमिन “ए’ भरपूर प्रमाणात असत. जे बॅक्‍टेरिया आणि व्हायरल इनफेक्‍शनशी लढण्यात मदत करतं.
3. फणस रक्‍तातील साखरेचा स्तर नियंत्रित ठेवण्यात मदत करतं.
4. फणसात पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. हाय ब्लडप्रेशर देखील कमी होते. हृदयावरील अनेक समस्या दूर करते.
5. भरपूर प्रमाणात लोह असल्याने अनिमिया वर मातकरण्यासाठी फणस खाणे परिणामकारक ठरते.

 

6. फणसात असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडांसाठी गुणकारी असते.
7. फणसात कॉपर मुबलक प्रमाणात असतात. यामुळे थाइरॉईड हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
8. फणसामध्ये फायबर्स आणि पाण्याचे प्रमाणही भरपूर असते. कॉन्स्टिपॅशनचा त्रास कमी होतो.
9. फणसात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात जे मसल बिल्ड करतात.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.