जाणून घ्या, आयुर्वेदिक कांस्य मसाजाचे फायदे

उष्णता दूर करणे, नेत्रविकार, त्वचारोग, मधुमेह अशा आजारांसाठी हमखास वापरली जाणारी कांस्य वाटी (काशाची वाटी) आता नामशेष होत चालली आहे. हेच लक्षात घेऊन आता कांस्य यंत्र विकसित करण्यात आले असून सध्या लोक कांस्य मसाजाचा अनुभव घेत आहेत.

आयुर्वेदात कांस्य वाटीचे मोठे महत्व आहे. शरीरातील वात कमी करणे,थकवा कमी करून थंडावा निर्माण करणे, निद्रानाश होऊ नये अशा अनेक कारणांसाठी पादाभ्यंग केले जाते.यामुळे शरीराला एक प्रकारची तुकतुकी येऊन ताजेपणा आणि उत्साह जाणवतो. मात्र हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही दुसऱ्या व्यक्तीसाठी वेळ नाही. अशावेळी दुसऱ्या व्यक्तीची मदत न घेता कांस्य थाळी यंत्रावर मसाज केला जात आहे.

असा केला जातो मसाज

-खुर्चीवर बसल्यानंतर यंत्र सुरू केले जाते.

-पाय स्थिर ठेवल्यानंतर पायाखालची थाळी फिरून मसाज करते.

-मसाज करण्यासाठी साजूक तूप किंवा खोबरेल तेलाचा वापर केला जातो.

-यंत्राला टायमर लावण्यात आला असून दहा मिनिटांनंतर मसाज पूर्ण झाल्यावर यंत्र फिरण्याचे थांबते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here