जाणून घ्या, “अ‍ॅसिडीटी’वरील घरगुती रामबाण उपाय

पुणे – अ‍ॅसिडीटी किंवा मराठीत आपण ज्याला आम्लपित्त असे म्हणतो ह्याचा त्रास प्रत्येकाला केव्हा ना केव्हा होतोच. कधी कधी तर टेन्शन किंवा स्ट्रेसमुळे सुद्धा अ‍ॅसिडीटी वाढते. छातीत जळजळ, पोटात तीव्र वेदना, ओकारी येणे, मळमळ, डोके दुखणे असा त्रास आम्लपित्त वाढल्याने होतो.

अनियमित जेवण हे अ‍ॅसिडीटीचं मुख्य कारण आहे. दरम्यान, अ‍ॅसिडीटी पासून वाचण्यासाठी आपण वेगवेगळी औषधं तर घेतोच पण… काही घरगुती उपाय सुद्धा अ‍ॅसिडीटीच्या त्रासातून तुमची सुटका करू शकतात.

 हे आहेत, अ‍ॅसिडीटी वर घरगुती उपाय –

1) जेवणानंतर थोडासा गूळखाल्ल्याने अ‍ॅसिडीटीपासून लगेचच सुटकारा मिळतो.

2) पहाटे उठल्यावर दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होतो.

3) जेवण झाल्यानंतर लवंग खाल्याने अ‍ॅसिडीटीपासून लगेचच सुटकारा मिळतो.

4) सकाळी उपाशी पोटी तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने अ‍ॅसिडीटीचा त्रास नेहमीसाठी समाप्त होतो.

5) जेवल्यानंतर अर्धा चमचा शोप खाल्ल्याने अ‍ॅसिडीटीपासून मुक्ती मिळते.

6) मुळ्यात लिंबू व काळ्यामीठाचे सेवन केल्याने अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होतो.

7) मनुकांना दुधात उकळून घ्या आणि ते थंड झाल्यावर त्याचे सेवन केल्याने अ‍ॅसिडीटीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

8) थोडसं कोरडं आलं चहात टाकून प्यायल्यानं अ‍ॅसिडीटीपासून लगेच मुक्ती मिळते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.