पुणे – करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालिकेच्या शिक्षण मंडळाकडून “लर्न फ्रॉम होम’ हा उपक्रम सुरू केला आहे.
पुणे महापालिकेच्या ई-लर्निंग प्रकल्पांतर्गत शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या मराठी व इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास पूरक असे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ऍपसाठी आवश्यक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वतंत्र लॉगीन व पासवर्ड उपलब्ध करून दिला आहे. तर शाळेतील बहुतांश वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गाचा व्हॉटस् ऍप ग्रुप तयार केला आहे.
ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे व्हॉट्स ऍप ग्रुप अद्याप तयार केले नसतील अशा उर्वरित सर्व शाळांनी ग्रुप तयार करण्याबात सूचना दिल्या आहेत. त्यासाठी पालकांचे मोबाइल क्रमांक
शिक्षकांना पाठवले आहेत. व्हॉट्स ऍप ग्रुपच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना डाऊनलोड करण्याबाबतच्या सूचना देणे तसेच त्यासाठी या ऍपचा वापर कसा करावा याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊन परिस्थितीमुळे पुणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ तसेच विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास मदत होईल या दृष्टीकोनातून विविध ऑनलाइन उपक्रमांची आखणी केली आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त