हेही जाणून घ्या

आज महिला आरक्षण, महिला सक्षमीकरण, महिला सन्मान याबाबत सर्वच पक्ष हिरीरीने आणि उच्चाराने बोलत असतात. पण आपण देशातील राष्ट्रीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांना दिलेली उमेदवारी पाहिली की वास्तव काय आहे हे लक्षात येते.

– सध्या केंद्रात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये 20 महिला उमेदवारांना तिकीट दिले होते. 2009 मध्ये भाजपाच्या 44 महिला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात होत्या. 2004 मध्ये ही संख्या 30 होती.

– देशाला पहिल्या महिला पंतप्रधान देणाऱ्या आणि सोनिया गांधी या महिला अध्यक्ष असणाऱ्या कॉंग्रेसचा विचार करायचा झाल्यास कॉंग्रेसने 2014 मध्ये 33 महिला उमेदवारांना उमेदवारी दिली होती. 2009 मध्ये कॉंग्रेसकडून 43 महिलांना रिंगणात उतरवण्यात आले होते. 2004 मध्ये हा आकडा 45 इतका होता.

– मायावतींनी 2004 मध्ये 20, 2009 मध्ये 29 आणि 2014 मध्ये 16 महिला उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी दिली.

– 2014 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या 16, आम आदमी पक्षाच्या 39 आणि तेलगू देसम पार्टीच्या 12 महिला रिंगणात होत्या.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवृत्त जनरल व्ही. के. सिंग यांनी गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांना 5,67,260 इतकी मते मिळाली. त्यांना मिळालेली मते ही प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा 42 टक्‍क्‍यांनी जास्त होती. हा उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठा विजय ठरला. दुसरीकडे संभल लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे सत्यपाल सिंह यांनी अवघ्या 5174 मतांनी विजय मिळवला. त्यांच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मतांमध्ये 0.49 टक्‍क्‍यांचा फरक होता.

Leave A Reply

Your email address will not be published.