लवकरच सुरू होणाऱ्या ‘क्लोन ट्रेन’ बाबत जाणून घ्या!

रेल्वे बोर्डचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय रेल्वेने गर्दीच्या मार्गावर 20 जोड्या क्लोन गाड्या विशेष गाड्यांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी बहुतांश गाड्या बिहारमध्ये धावणाऱ्या आहेत.  21 सप्टेंबरपासून हे कामकाज सुरू होईल.  त्यापैकी आगाऊ आरक्षणाचा कालावधी 10 दिवस असेल. या विद्यमान विशेष गाड्या आणि कामगार विशेष गाड्यांपेक्षा वेगळ्या असतील.  यासाठी आरक्षण 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

सध्या चालू असलेल्या 230 ट्रेन्समध्ये जर वेटिंग लिस्ट जास्त असेल तर ‘क्लोन ट्रेन’ चालवल्या जातील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या ‘क्लोन ट्रेन’ ची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात ‘क्लोन ट्रेन’ म्हणजे नेमके काय आणि त्याचे कार्य कसे असेल.

‘क्लोन’ म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तिची हुबेहूब प्रतिकृती. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात ‘ क्लोन ट्रेन’ ची संकल्पना मांडण्यात आली होती. यामध्ये जर एखाद्या ट्रेनमध्ये जर वेटिंग लिस्ट खूप जास्त असेल तर त्याच नावाची, त्याच क्रमांकाची, त्याच रूटवर धावणारी, त्याच थांब्यावर धावणारी, मात्र, मूळ ट्रेन सुटल्यावर एका तासानंतर धावणारी दुसरी ‘क्लोन ट्रेन’ सुरू करावी. ज्यामध्ये वेटिंगवरील प्रवाशांना कन्फर्म सीट मिळतील. यामुळे प्रवाशांसह रेल्वेलाही फायदा होईल. मात्र, या योजनेसाठी लागणारे नवे कोच, रूट क्लिअरन्स नसल्यामुळे ही योजना बासनात गुंडाळली गेली. याऐवजी वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना त्याच रूटवरील अन्य ट्रेनमधून प्रवास करण्याची संमती देणारी ‘विकल्प योजना’ आणली गेली.

मात्र, आता बऱ्याच कालावधीनंतर परत ‘क्लोन ट्रेन’ चर्चेत आली आहे. कारण सध्या बहुतांश ट्रेन बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाड्या आणि रूटदेखील रिकामे आहेत. त्यामुळे क्लोन ट्रेन सुरू केल्यास वेटिंगवरील प्रवासी रेल्वेला मिळत असल्यामुळे ट्रेन रिकाम्या धावणार नाहीत आणि प्रवाशांनाही निर्धारित दिवशीच प्रवास करता येईल. थोडक्यात, वेटिंग तिकीट कन्फर्म होणार असल्याची खात्री असल्याने जास्तीत जास्त प्रवासी ट्रेनची तिकिटे काढतील.

वीस ट्रेन्स आणि त्यांचे क्लोन ट्रेन्स म्हणजेच 40 ट्रेनमधील 19 ट्रेनमध्ये हमसफर कोच असेल आणि त्यांचे भाडेही हमसफर ट्रेनच्या बरोबरीचे असेल.  जन शताब्दी प्रशिक्षक म्हणून नवी दिल्ली ते लखनऊ दरम्यान ट्रेन धावणार असून त्याचे भाडे जनशताब्दीसारखेच असेल.  रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी या 20 ट्रेन्स आणि 20 क्लोन ट्रेन्स असलेल्या 40 गाड्यांचा तपशील जाहीर केला.  त्यांचे थांबे मर्यादित असतील.  सर्व गाड्या आरक्षित प्रवर्गामध्ये असतील, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.