हडपसर – नेतृत्व तेच ज्याला जनतेचा भक्कम पाठिंबा मिळतो. आज येथील कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा उत्साह आणि हडपसरकरांनी आज त्यांचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच या भागाचे आमदार चेतन तुपे यांच्यासह आमच्यावर दर्शवला आहे. त्यासाठी हडपसरकरांचे मनापासून धन्यवाद, असा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर परिसरात रोड शो करीत चेतन तुपे यांना मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. हडपसर गाडीतळ, मगरपट्टा चौक, शंकरमठ, वैदुवाडी, रामटेकडी, म्हाडा कॉलनी, ससाणेनगर यानंतर हडपसर गावामध्ये सांगता रॅलीची सांगता करण्यात आली. अजित पवार व उमेदवार चेतन तुपे पाटील यांचे जागोजागी उस्फुर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, भाजपाचे हडपसर अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, अमर तुपे, वासंती काकडे, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी नगरसेवक फारुख इनामदार,भूषण तुपे, रवी तुपे.
सुनील बनकर, शिवराज घुले, अजित घुले, आण्णा धारवाडकर, विजया कापरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विठ्ठल विचारे पाटील, जयप्रकाश जाधव,महादेव दंदी, राजू कांबळे,अभिमन्यू भानगिरे, जतिन कांबळे, योगेश सूर्यवंशी, संतोष खरात, नितीन होले, यादव हरने, सतीश भिसे, स्मिता गायकवाड, माजी नगरसेवक अशोक कांबळे, खन्नासिंग कल्याणी, शक्तीसिंग कल्याणी, वामन धाडवे, अरुण अल्हाट, रामभाऊ कसबे, प्रशांत पवार, महेश ससाणे,डॉ.शंतनु जगदाळे, अजिनाथ भोईटे, संतोष पाखरे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.