कोल्हापूर महानगरपालिकेस लिडरशीप पुरस्कारने सन्मानित

कोल्हापूर: ईएलईटीएस या संस्थेद्वारे पुणे येथे माहिती व संभाषण तंत्रज्ञान (ICT) या विषयावर गव्हर्नन्स ऍ़ण्ड पीएसयू समीट शिखर परिषद गुरुवार, दिनांक 20 जून 2019 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आयुक्तांनी कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत विविध विभागांद्वारे कार्यालयीन कामकाजात माहिती व संभाषण तंत्रज्ञान  (ICT) चा वापर कशा पध्दतीने करण्यात येतो. तसेच महापालिकेतर्फे शहरातील सामान्य नागरीकांना माहिती व संभाषण तंत्रज्ञान (ICT) द्वारे विविध प्रकारच्या सेवा व सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करुन दिल्या जातात इत्यादी बाबतचे सादरीकरण केले.

या सोहळयामध्ये कोल्हापूर महानगरपालिका, पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेड व साखर आयुक्त  यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये स्मार्ट गव्हर्नन्स इनीशीएटीव्ह बाय म्युनिसिपल कार्पोरेशन अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस लिडरशीप ऍ़वार्डने सन्मानीत करण्यात आले.

सदरचा ऍ़वार्ड इलेट्स टेक्नोमेडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रवी गुप्ता यांच्या हस्ते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्विकारला. यावेळी मुख्यमंत्री यांच्या सल्लागार श्वेता शालीनी, गुजरात अल्कलिज ऍ़ण्ड केमिकल लिमिटेड संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रेमकुमार गेरा, गुजरात राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाचे आयुक्त व शासनाचे सचिव के.खंधार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षा व व्यवस्थापक संचालिका नयना गुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)