नवी दिल्ली : माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा अरुण शौरी, माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी जम्मू काश्मीरच्या माजी तीन मुख्यमंत्र्यांच्या तत्काळ सुटकेसाठी संयुक्त निवेदन जारी केले आहे.
Statement reads, "We demand the immediate release of all political detainees in Kashmir, especially the three former Chief Ministers of J&K (Farooq Abdullah, Omar Abdullah & Mehbooba Mufti). Under Modi govt, democratic dissent is being muzzled by coercive administrative action". https://t.co/9NS0GvEuWN
— ANI (@ANI) March 9, 2020
या निवेदनात म्हटले आहे की, काश्मीरमध्ये ताब्यात घेतलेल्या सर्व राजकीय नेत्यांची तात्काळ सुटका करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यात विशेषत: जम्मू-काश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांचा समावेश आहे.