‘विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे’

शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांची मागणी

पुणे – सत्तेत असताना भाजपने शिवसंग्राम पक्षावर अन्याय केला आहे. आता विधानपरिषदेत भाजप विरोधी पक्षात बसल्याने विरोधी पक्षनेते पदाची निवड करावी लागणार आहे. यामध्ये, मी ज्येष्ठ असल्याने विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते पद मला मिळावे, अशी आग्रही मागणी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पुण्यात केली.

शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. तानाजी शिंदे, आमदार डॉ. भारती लव्हेकर, विक्रांत आंब्रे, शिवसंग्रामचे पुणे शहराध्यक्ष भरत लगड, रजनी पाचंगे, शेखर पवार आदी उपस्थित होते.

मेटे म्हणाले, “राज्यात पुढील काळात महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका शक्‍य होईल तेथे भाजपसोबत युती आणि शक्‍य नाही तेथे स्वबळावर लढवण्यात येणार आहे. तसेच मराठा समाजासाठी सारथी संस्था निर्माण केली होती. त्याचे पंख छाटण्याचे काम आताच्या सरकारने केले आहे. मराठा आरक्षणात सुधारणा होण्यासह गड-किल्ले सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.