शाहजहांपूर – उत्तर प्रदेशाच्या शाहजहांपूर मधील जिल्हा न्यायालयात वकिलाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळावर पिस्तूल सोडून पळ काढला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलास घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे, तसेच आरोपींचा शोध सुरू केला आहे.
भूपेंद्र सिंह असे गोळीबारत ठार झालेल्या वकिलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी 11:45 च्या सुमारास न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील ACJM कार्यालयात ही हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरच पिस्तूल ठेवली व तेथून पळ काढला.
या घटनेच्या वेळी कार्यालयात कोणीच उपस्थित नव्हते. माहिती मिळताच एसपी आनंद, डीएम इंदर विक्रम सिंह यांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला.
पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजचा शोध घेत आहेत.
दरम्यान कोर्ट परिसरात पिस्तुलसह एखादा व्यक्ती प्रवेश करा करू शकतो. या व्यक्तीला पिस्तुलसह कोर्टात प्रवेश कसा मिळाला यावरून सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.