नवी दिल्ली : वकिलांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी दिल्लीच्या जिल्हा न्यायालयातील पोलिसांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन आज बुधवारीही सुरूच राहिले.
वकिलांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की पोलिसांनी वकिलांवर अन्यायकारक कारवाई केली त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन आम्हाला वरीष्ठांकडून दिले गेले होते. पण त्या अनुरूप कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आमचा संप सुरूच ठेवला आहे.
वकिलांवर गोळीबार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही हा संप सुरूच ठेवणार आहोत. दरम्यान तिकडे, पोलिही आक्रमक झाले आहेत त्यांनी वकिलांवर कारवाई करण्याची मागणी करीत नुकतीच मोठी निदर्शनेही केली होती. कोर्टाच्या आवारातील पार्किंगच्या वादातून पोलिस व वकिलांमध्ये हा संघर्ष सुरू झाला आहे.