सर्वोच्च न्यायालयाच्या चेंबरमध्येच वकीलाचा मृत्यू

नवी दिल्ली- करोनाची एवढी भिती देशाच्या नागरिकांच्या मनात बसली आहे की अडचणीत अथवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्याची माणुसकीही त्यात संपली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात असाच काहीसा प्रकार घडला. ह्रदयविकाराचा झटका आल्यावर मदतीसाठी कोणीही पुढे न आल्याने एका 80 वर्षांच्या व्यक्तीला न्यायालयाच्या चेंबरमध्येच प्राण गमवावे लागले. त्यांची मुलगी मदतीसाठी लोकांना पुकारा करत होती, मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही.

एस. के. धींडसा असे त्या वकीलांचे नाव आहे. आपल्या काही कामानिमित्त ते आज न्यायालयात आले होते. मात्र नंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांची तब्येत बिघडली असल्याचे त्यांनी मुलीला फोनवर सांगितले. मुलगी कारमधून उतरून त्यांच्या मदतीसाठी धावली. मात्र सुरक्षा रक्षकांनी तिला गेटवरच अडवले. बाहेर पडण्याच्या गेटमधून ती प्रवेश करत असल्याचे कारण तिला देण्यात आले. त्या गेटने ती आत गेल्यावर ऍम्बूलन्स बोलावण्यासाठी कारमधून खाली उतरली, तर ऍम्बूलन्स जागेवर नव्हती. ऍम्बूलन्स सापडल्यावर तिचा चालक जागेवर नव्हता. मात्र करोनाच्या भितीमुळे कोणीही या काळात तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. सर्वोच्च न्यायालयातील चिकित्सा केंद्रातही वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. मात्र त्यावेळी तेथे कोणीही उपलब्ध नव्हते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.