Lava Shark Launched | Lava ने भारतात नवीन स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. कंपनीने Lava Shark सीरिजमधील नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन असून, याची किंमत खूपच कमी आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय, 5000mAh ची दमदार बॅटरी मिळते. Lava Shark स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Lava Shark चे स्पेसिफिकेशन्स
Lava Shark मध्ये 6.67-इंच HD+ पंच होल डिस्प्ले देण्यात आला असून, यात 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. लावाचा हा फोन UNISOC T606 प्रोसेसरसह येतो. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढवू शकता.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह येणारा 50MP चा एआय रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तर पॉवर बॅकअपसाठी 18 वॉट चार्जिंग सपोर्टसह येणारी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनसोबत बॉक्समध्ये 10W चार्जर मिळतो. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. या फोनचे डिझाइन काही प्रमाणात आयफोन सारखे आहे. फोनचे बॅक पॅनेल हुबेहुब Apple iPhone 16 Pro सारखे आहे.
Lava Shark ची किंमत
Lava Shark स्मार्टफोन फक्त 4GB RAM + 64GB स्टोरेजसह येतो. या व्हेरिएंटची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. हा फोन Titanium Gold आणि Stealth Black रंगात येतो. फोनच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी मिळते. फोनला लावाच्या रिटेल स्टोर्सवरून खरेदी करता येईल.