कोरोना विलगता कक्षातील कपडे धुण्यास धोब्यांचा नकार

यवतमाळ : येथील जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात असणाऱ्या रुग्णांचे कपडे धुण्यास लॉण्ड्री व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. या कक्षातील बेडशीट, पडदे आदी कपडे या कक्षातील कर्मचारी धोब्याला अन्य वॉर्डातील कपड्यांप्रमाणे देत असत.

हे कपडे धुताना लागण होण्याची भीती वाटत असल्याने ते धूण्यास या धोब्यांनी नकार दिला आहे. या कपड्यांना हात लावला तर आम्हालाही बाधा होण्याची भीती आम्हाला वटते, असे अशोक चौधरी या कपडे धुणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

दरम्यान, राज्यात 49कोरोना बाधीत असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर देशातील बाधीतांची संख्या 169वर पोहोचली. त्यात 141 भारतीय आणि 25 परकीय नागरीकांचा समावेश आहे. जानेवारीत कोरोनाची बाधा झाल्यापासून प्रथमच चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र परदेशातील बाधितांमुळे संख्या वाढली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.