सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब यांच्या ‘खिचिक’चं पोस्टर लाँच

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या खिचिक या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब या पोस्टरवर दिसत असून, त्यांचा अतरंगी लूक लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे नावापासूनच वेगळेपणा असलेला हा चित्रपट नेमका आहे तरी काय अशी उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते , शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण , यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत

चित्रपटाचं पोस्टर अतिशय आकर्षक आहे. हातात गिटार घेऊन असलेला प्रथमेश परब आणि एक बांबू घेऊन असलेला सिद्धार्थ जाधव दोघंही अतरंगी लूकमध्ये आहेत. तर या दोघांच्या मध्ये दोन लहान मुलं आहेत. त्यातला एक मुलगा मागे लावलेल्या फोटोंकडे पाहात आहे. त्यामुळे पोस्टरमधून चित्रपटाची कथा काय असेल, याचा अंदाज बांधता येत नाही. मात्र, प्रथमेश आणि सिद्धार्थच्या लूकमध्ये चित्रपट मनोरंजक असेल हे नक्की. हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×