बारामती: अखिल तांदुळवाडी वेस चौकात मधील श्रीमंत आबा गणपती येथून बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजप, शिवसेना, रा.स.प., शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, आर.पी.आय. (A) महायुतीच्या अधिकृत उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराचा आज सकाळी शुभारंभ झाला.
भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रचार प्रमुख उपस्थिती म्हणून बारामती नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते नगरसेवक विष्णुपंत चौधर अल्पसंख्याक पुणे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अल्ताफ भाई बागवान बूथ प्रमुख सुनील राऊत बूथ प्रमुख अनंता काळे ,शक्ती केंद्रप्रमुख सुधाकर पांढरे, पत्रकार शाकीर भाई बागवान अरबाज बागवान महेंद्र जेवरे बूथ प्रमुख वेदपाठक याच बरोबर भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान जनतेशी संवाद साधत पत्रके देण्यात आली व भारतीय जनता पार्टीला निवडून देण्याचे आव्हान करण्यात आले.
शहरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर, चाँद शावली बाबा दर्गा, श्रीमंत बाबा गणपती यांचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार निवडून यावा यासाठी साकडे घातले.