पुणे – सर्व सुविधांनीयुक्त टाऊनशीप म्हणजेच एकीकृत संकल्पनेतील पायोनियर असलेल्या `मगरपट्टासिटी ग्रुप`च्या मगरपट्टासिटी व नांदेडसिटी या दोन्ही भव्य टाऊनशीपच्या यशस्वीतेनंतर आता सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर येथे `रिव्हर व्ह्यू सिटी` या भव्य टाऊनशीपचा शुभारंभ करण्यात आला आहे.
टाऊनशीप संकल्पनेत अत्याधुनिक सुविधा, शहरी जीवनशैलीतील अनेकविध नव्या पैलूंची जोड देणाऱ्या मगरपट्टासिटी व नांदेडसिटी टाऊनशीप संकल्पनेच्या साखळीत `रिव्हर व्ह्यू सिटी` चा समावेश झाला आहे.
पुणे- सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर येथील ५०० एकरावर `रिव्हर व्ह्यू सिटी` #MyCityMyWorld (माझं शहर, माझं जग) असे ब्रीद घेऊन या नव्या व भव्य टाऊनशीपचा शुभारंभ करण्यात आला आहे.
बहुतांश आयटी पार्क कॅम्पस, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठाची जवळीकता, आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळ व प्रस्तावित रिंग रोडची सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी या प्रमुख वैशिष्ट्यांसह असणाऱ्या `रिव्हर व्ह्यू सिटी`त महानगराजवळच पण प्रदुषणमुक्त, हिरवाई, निसर्ग संपन्न, आनंदी आयुष्यासाठी सर्व अत्याधुनिक सुविधा देणाऱ्या साऱ्या गोष्टी इथे असणार आहे. `रिव्हर व्ह्यू सिटीत` शुभारंभासह विक्रीसाठी खुल्या करण्यात आलेल्या पहिल्या `फाल्कन टॉवर्स` या इमारतीमध्ये २, २.५ आणि ३ बीएचकेच्या सदनिका असणार आहेत. ज्याची किंमत साठ लाख छप्पन हजारांपासून पुढे असणार आहे.
`रिव्हर व्ह्यू सिटी` – सुखकारक व समतोल आयुष्यासाठी…
आपलं हक्काचं घर निसर्गाच्या सान्निध्यात शहराच्या धावपळीपासून अगदी थोडसं बाजूला असावे पण सर्वत्र उत्तम कनेक्टिव्हिटी असावी असा सर्वांचा प्रयत्न व प्राधान्यक्र्म असतो. असाच हक्काच्या घराचा पर्याय `रिव्हर व्ह्यू सिटी`च्या माध्यमातून देऊ केला आहे. जिथे केवळ तुम्ही, तुमचे कुटुंब, तुमचे सुविधासंपन्न शहर आणि तुमचे जग असेल.
कारण `रिव्हर व्ह्यू सिटी`मध्ये शाळा-महाविद्यालय, ऑफिस यांच्या जवळीकतेसोबतच आधुनिक सुविधांमुळे तुमच्या दररोजच्या जगण्याला एक सहजता, आरामदायीपणा मिळणार आहे. सोबत तुम्हाला मिळेल तुमच्या छंद आणि आवडींसाठी पुरेसा वेळही.
आरामदायी जीवनासाठी भरपूर सुविधा
`रिव्हर व्ह्यू सिटी` मध्ये शहरी जीवनशैलीशी उत्तम असा मेळ साधणार्या सुविधा असणार आहेत. ज्यामध्ये टाऊनशीप लेवलवरील सुविधांमध्ये सीसीटीव्ही, स्वतंत्र फायर सिस्टिम, पाणी व कचरा व्यवस्थापन, स्वतंत्र वीज उपकेंद्र, टाऊनशीप परिसरातच शाळा, सर्वसुविधांनी युक्त खेळाचे मैदान, इंटरनेट सेवा, पोडियम लेवलवरील सुविधांमध्ये मोहक लॉन, सिटिंग विथ पॅगोडा, अॅक्युप्रेशर पाथवे, स्केटिंग ट्रॅक, किशोरवयीन मुले-मुली पालक व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र जागा, ओपन एअर जीम व मेडिटेशन झोन तर तयार होणाऱ्या क्लब हाऊसमध्ये पार्टी लॉन, बाग, क्लब फोअरकोर्ट, कम्युनिटी हॉल, अॅम्फीथिअटर, इनडोअर जीम, चिल्ड्रन प्ले एरिया, मल्टिपर्पज कोर्ट, पेट पार्क, बॉनफायर विथ बार्बेक्यू प्रोव्हीजन आदी सुविधा असणार आहेत.
याशिवाय इथे असणार आहे भविष्यात तुम्हाला नितांत गरजेची असणारी ईव्ही चार्जिंग झोन (इलेक्ट्रॉनिक व्हेईकल चार्जिंग झोन), सायकल स्टेशन, कारवॉशिंगसाठी स्वतंत्र जागा देखील. या अत्याधुनिक सुविधांसोबत तुम्हाला आरामदायी जीवनशैलीचा कुटुंबासोबत जगण्यातल्या सहजपणाचा आनंद घेता येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मगरपट्टा सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सतीश मगर यांनी सांगितले की, “ मगरपट्टा सिटीग्रुपने नेहमीच काळाच्या पुढचा विचार केला आहे. मगरपट्टासिटी व नांदेडसिटीमधील वीस हजारांहून अधिक समाधानी कुटुंब, टाऊनशीप परिसरातच आयटी हबच्या माध्यमातून १.६२ कोटी चौरस फूट व्यावसायिक जागेची उभारणी व त्यातून उपलब्ध झालेला अडीच लाखांहून अधिक रोजगार, सुमारे २७० एकराहून अधिक खुली जागा, १३३ एकराहून अधिक हिरवाईने गर्द परिसर, संपूर्ण कचरा निर्मूलन, पर्यावरणपूरक व निसर्गसंपन्नतेसोबतच एक लाखांहून अधिक वृक्षसंख्या. या व अशा आम्ही देऊ केलेल्या सुविधासंपन्न, आरोग्यदायी व सुरक्षित जीवनशैलीने आमच्या गाठीशी मोठा अनुभव आणि वारसा जोडला आहे. या अनुभव व वारसामधूनच मगरपट्टासिटी ग्रुप एक ब्रँड म्हणून जनमानसात रूजला आहे. आणि म्हणूनच नागरिकांनी अशा अत्याधुनिक शहराचा एक भाग बनून जीवन आनंदी करावे असे आवाहन मी करेन.“