तैयुआन (चीन) – चीनने आज अतिशय उच्च दर्जाच्या मॅपिंग सॅटेलाईटचे प्रक्षेपण केले. उत्तरेकडील शांक्सी प्रांतातील तैयुआन सॅटेलाईट लॉंच सेंटरनमधून हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला. “द झियुआन 3′ असे या उपग्रहाचे नाव आहे.
लॉंग मार्च 4 बी रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला. स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. लॉंग मार्च रॉकेट सिरीजची ही सलग 341 वी अंतराळ मोहीम होती.
लॉंग मार्च रॉकेट सिस्टीम ही देशांतर्गत उपग्रह अंतराळात सोडण्यासाठीची चीनची सर्वात किफायतशीर रॉकेट सिरीज आहे. चीनच्या स्पेस एजन्सीकडून अंतराळ मोहिमांसाठी या रॉकेट सिरीजचा सर्रास वापर केला जातो.
या रॉकेटवर दोन उपग्रह बसवण्यात आले होते. त्यातील एक अंधारातील वस्तू ओळखण्यासाठी वापरला जाणार आहे. तर दुसऱ्या उपग्रहाद्वारे व्यवसायिक डाटा संकलनाचे काम केले जाणार आहे.
हे दोन्ही उपग्रह शांघाय ऍसेस स्पेसफ्लाईट टेक्नोलॉजी कंपनी लिमिटेडकडून विकसित करण्यात आले आहेत. या तिन्ही उपग्रहांनी पृथ्वीच्या अंतराळ कक्षेमध्ये प्रवेश केला आहे, असे तैयुआन सेंटरने सांगितले आहे.