पुणे – लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीने विनासायास फास्टटॅगसंबंधी सर्व गरजांची पूर्तता सहज सुलभ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आपल्या शाखाविस्ताराच्या बळावर पुणे-पिंपरी चिंचवड परिसरातील सहकारी गृहरचना संस्थांमध्ये फास्टटॅग अभियानाची सुरवात केली आहे.
फास्टटॅग आपल्या दारी या अंतर्गत सहकारी गृहरचना संस्थांच्या परिसरात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून संस्थेतर्फे फास्टटॅग उपलब्ध करून दिला जात आहे. आत्तापर्यंत एकूण 100 हून अधिक सहकारी गृहरचना संस्थांमध्ये फास्टटॅग मोहीम राबविण्यात संस्था यशस्वी ठरलेली आहे.
ज्याला सभासदांचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती संस्थेच्या पुणे विभागाचे सहा. क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे यांनी दिली.
लोकमान्य सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये फास्टटॅग सुविधाही उपलब्ध आहेच. तसेच ज्यांना त्यांच्या निवासी सहकारी गृहरचना संस्थेमध्ये फास्टटॅग मोहीम उपलब्ध करून घायची असेल त्यांनी संस्थेच्या नजीकच्या शाखेशी किंवा 020-66853000 या क्रमांकावर संपर्क साधावा.
या अभियानांतर्गत जास्तीतजास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी केले आहे.