बीजिंग: चीनने अंतराळात पाठवलेला सॅटेलाइट लॉन्च विइकल शुक्रवारी अयशस्वी झाल्याने अंतराळात राज्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनला मोठा धक्का बसला आहे. चीनचे सर्वात मोठे घन-इंधनने चालणारे रॉकेट कुआईझाऊ-11 चीनच्या पश्चिम भागातील जिक्ऊक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटरमध्ये फेल झाला.
शुक्रवारी, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:17 वाजता, हा चिनी उपग्रह अयशस्वी झाला. यासंदर्भात माहिती देताना चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की उपग्रह बिघडण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. या उपग्रहाचे डिझाईन चीनने कमी पैशांत केले होते.
या उपग्रहाबाबत चीनने दावा केला होता की तो एक अत्यंत विश्वासार्ह रॉकेट आहे; परंतु या अपघातामुळे त्यांचा दावा फोल ठरला आहे. हे चिनी रॉकेट सुमारे 70.8 टन पेलोड नेण्यास सक्षम आहे. हा चिनी उपग्रह अंतराळात खालच्या भागांमध्ये उपग्रहांना स्थापित करण्याचे काम करते.
यापूर्वी या वर्षी मे महिन्यात आपल्या स्पेस स्टेशनवर कार्गो घेऊन जाण्याच्या विचाराने लॉन्च केलेल्या चीनच्या टेस्ट रॉकेटला तांत्रिक अडचणीनंतर पृथ्वीच्या दिशेने परतला होता. यावेळी मोठे संकट ओढवले असते. मात्र, यातून बचाव करण्यात आला.