बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला होता. यामध्ये कंगनाचा दमदार ऍक्शन लुक दिसून आला. आता या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. या टीजरमध्ये ऍक्शन पॅक्ड धमाका असणार यात किंचितही शंका नाही.
‘धाकड’ चित्रपटात कंगना बरोबर बॉलिवूड अभिनेत्री तब्बू देखील दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सोहेल मक्काई यांनी केली असून, पुढील वर्षी (2020) दिवाळीत हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, अभिनेता राजकुमार राव आणि कंगणा यांचा ‘जजमेंटल है क्या’ सिनेमाला प्रेक्षकांनी पाठ दाखविली असली तरी कंगणाच्या ‘धाकड’ चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.