मुंबई – बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता ‘आयुष्मान खुराना’च्या आगामी “शुभ मंगल ज्यादा सावधान” या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात आयुष्मान प्रेम आणि संस्कार अशा विचित्र अवस्थेमध्ये अडकलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण या चित्रपटात तो प्रथमच एका समलैंगिक युवकाचा रोल साकारत करतो आहे.
‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाचा सिक्वल असून हितेश केवालियाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच आनंद एल राय या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. दरम्यान, या चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या अपोझिट कोटा फॅक्टरी स्टार ‘जितेंद्र कुमार’ आपल्याला दिसणार आहे.
Jeetega pyaar, maanega pura parivaar! #ShubhMangalZyadaSaavdhan ? ♥ trailer out now!https://t.co/8IHmIPdHFi@smzsofficial@raogajraj @Neenagupta001 @Farjigulzar @iammanurishi @SunitaRajwar @maanvigagroo @Panawasthy_31 #NeerajSingh
Written and directed by @HiteshKewalya
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) January 20, 2020
शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपटात आयुष्मान आणि जितेंद्र कुमार व्यतिरिक्त गजराव राव, नीना गुप्ता, मानुर्षी चढ्ढा, सुनिता राजवर, मानवी गागरू आणि नीरज सिंह हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. येत्या २१ फेब्रुवारीला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येत आहे.