जेएनयु विद्यार्थ्यांवर लाठीमार

नवी दिल्ली : होस्टेलच्या शुल्कात झालेली वाढ मागे घेण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा या मागणीसाठी राष्ट्रपती भवनावर काढलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी सोमवारी (दि. 9) लाठीमार केला. मोर्चामुळे विद्यापीठात सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विद्यापीठाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. पोलिसांनी विद्यापीठाची सर्व प्रवेशद्वारे बंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिस गो बॅकच्या घोषणा देण्यास सुरवात केली.

दरम्यान उद्योग भवन, लोककल्याण मार्ग आणि मध्यवर्ती सचिवालय मेट्रो स्थानक येथील बाहेर पडण्याचे आणि प्रवेशाचे मार्ग प्रशासनाने बंद केले.
होस्टेलची शुल्कवाढ मागे घेण्यासाठी जेएनयुच्या विद्यार्थ्यांचे महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे.

प्रशासनाने इशारा देऊनही विद्यार्थ्यांनी सत्र परीक्षांवर बहिष्कार कायम ठेवला आहे. येथील वातावरण सुरळीत होण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल दिला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही

Leave A Reply

Your email address will not be published.