विंडोजमध्ये आला धोकादायक ‘बग’, तुमचा प्रिंटर कधीही होऊ शकतो हॅक

जर तुमच्याकडे लॅपटाॅप किंवा संगणक असेल आणि त्यामध्ये विंडोज आॅपरेटिग सिस्टम असेल आणि त्यास प्रिंटर जोडलेला असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.  तुमचा प्रिंटर एका ‘बग’मुळे कोणत्याही वेळी हॅक होऊ शकतो. कारण इतक्या मोठा ‘बग‘ फिक्स करण्यासाठी अद्याप कंपनीकडून कोणतीही टाइमलाइन देण्यात आलेली नाही.

विंडोजमधील या ‘बग’बाबत ब्लिपिंग काॅम्प्यूटरने माहिती दिली आहे, जी एक वेबसाइट आहे. त्यांनी दिलेल्या या अहवालात संशोधकांनी सांगितले आहे की, विंडोज आॅपरेटिंग सिस्टममध्ये एक ‘बग’ आहे, ज्याच्यामुळे तुमचा प्रिंटर कोणत्याही वेळी हायजॅक होऊ शकतो.

अहवालात म्हटले आहे की, या ‘बग’चा फायदा घेत हॅकर आपल्या खासगी नेटवर्कमध्ये प्रवेश करू शकतो. विंडोजमधील या ‘बग’चा थेट विंडोज प्रिंट स्पूलरशी संबंध आहे जो प्रिंटिग प्रोसेस मॅनेज करतो.

या ‘बग’चे नाव CVE(सीव्हीई)-2020-1048 असे सांगण्यात आले आहे. सेफब्रीच लॅबचे संशोधक पेलेग हैदर आणि टोमर बार यांनी ही माहिती दिली आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, हा ‘बग’ फिक्स करण्यासाठी मायक्रोसाॅफ्टने चालुवर्षीच्या मे महिन्यात एक अपटेड जारी केले होते पण त्यामध्ये लूपहोल (पळवाट) राहिलं होतं.  त्यामुळे प्रिंटर हॅक होण्याचा धोका अद्याप कायम आहे.

या ‘बग’बाबत मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, ते लवकरच याबाबत अपडेट जाहीर करतील. जरी निश्चित तारीख सांगितली गेली नसली तरी 11 ऑगस्टला या ‘बग’बाबत अपडेट जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.