नोटाबंदीनंतरचे ताजे व्हिडीओ कॉंग्रेसकडून जारी 

मोदी सरकारवर नोटांची अवैध अदलाबदल करणाऱ्यांचा बचाव करत असल्याचा आरोप 

नवी दिल्ली –
कॉंग्रेसने बुधवारी नोटाबंदीनंतरचे ताजे व्हिडीओ जारी केले. त्यांचा संदर्भ देत पक्षाने मोदी सरकारवर चौकशीचा आदेश न देऊन नोटांची अवैध अदलाबदल करणाऱ्यांचा बचाव करत असल्याचा आरोप केला.
कॉंग्रेसने 26 मार्च आणि 9 एप्रिलला नोटाबंदीनंतरचे व्हिडीओ जारी केले होते. त्यानंतर बुधवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत ताजे व्हिडीओ जारी केले.

बॅंक अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या निकट असणाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या रकमेची अदलाबदल झाल्याचे व्हिडीओंमधून दिसत असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला. मात्र, त्या व्हिडीओंच्या सत्यतेची ग्वाही त्यांनी दिली नाही. नोटांच्या अदलाबदलीचे प्रकार झाले त्यावेळी चौकीदार झोपेत होते. त्या लुटीत सामील असणाऱ्यांचा बचाव केला जात आहे. चौकशीच्या अभावातून तेच सिद्ध होते. नोटाबंदीचा लाभ गुन्हेगारांनाच झालेला दिसतो, असा आरोपही सिब्बल यांनी केला. त्यावर सरकारकडून तातडीने कुठली प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.