कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी कार’मध्ये बनविले घर

आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ते त्यांच्या गाडीतच राहतात

भोपाळ: भोपाळ येथील एका डॉक्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डॉक्टरांच्या फोटो ‘ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी’ ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘भोपाळच्या जेपी हॉस्पिटलचे डॉ. सचिन नायक आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या गाडीतच राहतात’. या फोटोत डॉ. सचिन नायक पुस्तक वाचत आहेत, आणि त्यांच्या आसपास आवश्यक वस्तू दिसतात.

हा फोटो कोरोना हीरो हॅशटॅगसह पोस्ट केला गेला आहे. या फोटोचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे, तर मध्य प्रदेशचे सीएम शिवराजसिंह चौहान यांनीही ट्विटचे कौतुक केले आहे.

सीएम शिवराजसिंह चौहान यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, कोव्हीड १९’च्या विरोधात युद्ध लढणार्‍या तुमच्यासारख्या योद्धांचे मी आणि संपूर्ण मध्य प्रदेश कौतुक करतो. जर आपण सर्वजण या संकल्पाने पुढे जात राहिलो तर आपण लवकरच हे युद्ध जिंकू. सचिन जी, आम्ही तुमच्या भावनेला सलाम करतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.