बाप्पांचे जल्लोषी स्वागत…

सातारा – ग्रामीण भागातून शहरात गणेश मूर्तीसाठी आलेले काही नागरिक दुचाकीवरुनच अशाप्रकारे बाप्पांना घरी घेऊन जात होते.

बाप्पांना घेऊन जाण्यासाठी पुरुषांप्रमाणेच महिलांची संख्याही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात होती. बॉम्बे रेस्टॉरंट येथून बाप्पांची मूर्ती घरी घेऊन जात असताना मुलीसह महिलांचे टिपलेले छायाचित्र.
घरगुती प्रतिष्ठापनेसाठी गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन जाताना तरुणी.गेल्या काही दिवसांपासून लागलेली बाप्पांच्या आगमनाची आतुरता सोमवारी संपली. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सोमवारी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती.

अधिकाधिक आकर्षक आणि उंच मूर्ती घेण्यासाठी नागरिक संपूर्ण परिसर फिरत होते. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे बॉम्बे रेस्टॉरंट परिसर गर्दीने गजबजून गेला होता.

कुंभारवाड्यात घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. तर दुसऱ्या छायाचित्रात शालेय गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती घेऊन जाताना फेटे परिधान केलेल्या विद्यार्थिनी व शिक्षक.

Leave A Reply

Your email address will not be published.