म्हसवडमध्ये पोलिसांचे सशस्त्र संचलन

म्हसवड – गणेशोत्सव व दुर्गा उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर म्हसवड पोलीस स्टेशनचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून पोलिसांचे सशस्त्र संचलन करण्यात आले . संवेदनशील समजल्या जाणाऱ्या म्हसवड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी व सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या व दुर्गात्सवाच्या पार्श्‍वभूमीवर म्हसवड शहरातुन पोलिसांचे सशस्त्र संचलन करण्यात आले.

यावेळी नूतन सपोनि. गणेश वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचाऱ्यांनी संचलन केले. यावेळी सपोनि. वाघमोडे यांनी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव शांततेत व भक्तीमय वातावरणात साजरा करावा. मुख्यतः गणेश मूर्ती स्थापन करण्यात आलेल्या गणेश मंडपाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी.

जेणे करून कोणतीही दुर्घटना घडू नये. यासाठी मंडपातील लाईटचे डेकोरेशन सुरक्षित असावे या तसेच या उत्सव कालावधीत व विषेशता गणेश विसर्जन मिरवणुक ही डॉल्बी मुक्त शांततेत व पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढावी. या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी काळजी घ्यावी व हा गणेशोत्सव शांततेत व भक्तीमय वातावरणात साजरा करावा असे आवाहन सपोनि. वाघमोडे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.