मुंबई – अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराची अख्खा देश वाट पहात आहे. त्याची मुहूर्तमेढ आज भूमिपूजनाने होणार आहे. त्यामुळे अवघी अयोध्या नगरी फुलांनी आणि विद्यूत रोषणाईने झळाळून निघाली आहे. यातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला.
नमस्कार.कई राजाओं का ,कई पीढ़ियों का और समस्त विश्वके राम भक्तोंका सदियों से अधूरा सपना आज साकार होता दिख (cont) https://t.co/9vYy3nRylh
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 5, 2020
लतादीदींनी ट्विट केले आहे की,’नमस्कार. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे, शीलान्यास होत आहे. मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय माननीय लालकृष्ण आडवाणींचं आहे. कारण त्यांनी या मुद्द्यावरून रथयात्रा सुरू करून संपूर्ण भारतात जनजागृती केली होती आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा श्रेय आहे.
त्या पुढे म्हणाल्या,’आज करोनामुळे लाखो रामभक्त तिथे पोहोचू शकले नसले तरी त्यांचं मन श्रीराम यांच्या चरणीच लीन असेल. आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण विश्व खूप खूश आहे. जणू प्रत्येक श्वास आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून जय श्री राम हा उच्चार होत आहे.’