लतादिदींच्या प्रकृतीत सुधारणा

मुंबई : प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्यावर डॉ. पतीत समधानी यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू आहेत, अशी माहिती मंगेशकर कुटुंबियांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली.

त्यांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने 11 नोव्हेंबरला रात्री उशीरा ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. “”आम्हाला कळवण्यात आनंदस होत आहे की तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे लता दिदी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आमच्यासोबत राहिल्याबद्दल आभार. देव महान आहे” असे त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई मिररने रुग्णालयातील सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लता मंगेशकर यांना न्युमोनिया, हृदयविकार आणि छातीत इन्फेक्‍शन झाले आहे. त्यांना अँटीबायोटिक्‍स देण्यात येत आहेत.
आपल्या सात दशकांच्या करीयरमध्ये लता मंगेशकर यांनी 30 हजारहून अधिक गाण्यांचे पार्श्‍वगायन केले. त्यांना 2001 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2004 मध्ये त्यांनी यश चोप्रा दिग्दर्शित विरझारा या चित्रपटासाठी शेवटचे पार्श्‍वगायन केले होते.

मंगेशकर यांना रूग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समाज माध्यमांद्वारे वेगाने सर्वत्र पसरले. त्यानंत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी प्रार्थना सुरू केल्या. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here