मुंबई – गान कोकिळा आणि भारतरत्न ‘लता मंगेशकर’ यांना करोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या लता दीदींवर उपचार चालू असून, त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे.
त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. त्या लवकरात लवकर बरे व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सध्या त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोनदिवसांपासून दीदींची तब्येत खालवली असल्याचे वृत्त समोर आलं होतं. मात्र, दीदींच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त नाकारले होत.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निकटवर्तीय अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना घरी आणले जाईल. असं त्या म्हणाल्या आहेत.