मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते ‘इरफान खान’ यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. इरफान खानची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी इरफान खान यांनी आपल्या चात्यांसाठी सोशल मीडियाद्यारे एक शेवटचा संदेश दिला होता. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफान यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.