पॅन हा प्राप्तीकर खात्यातर्फे जारी केला जाणारी अक्षरे-अंक (अल्फा न्यूमेरिक) ओळख असते तर बारा आकडी आधार ओळख क्रमांक युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (यूआयडीएआय) जारी केला जातो. हे दोन्ही क्रमांक लिंक करण्यासाठी दोन अगदी सोपे मार्ग आहेत. पहिला म्हणजे http://www.incometaxindiaefiling.gov.in साईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरून UIDPAN<SPACE><12 digit Aadhaar><Space><10 digit PAN> असा एसएमएस 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवून ही प्रक्रिया पूर्ण करता येते. उदाहरणार्थ -UIDPAN 123456789123 ABCDE1234M
आधार कार्डसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीकडे आधार आणि पॅन ही दोन्ही कार्डे असतील तर ती लिंक करणे बंधनकारक आहे. जर प्राप्तीकर विवरण भरणाऱ्याकडे आधार क्रमांक नसेल तर त्याचे पॅन कार्ड अवैध ठरणार नाही. मात्र आधार क्रमांक असल्यास त्याची माहिती प्राप्तीकर खात्याला द्यावी लागणार आहे.