नवी दिल्ली : आयकर परतावा भरण्याची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली.
आर्थिक वर्ष 18-19 साठी आयकर परतावा भरण्याची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली. उशीरा केलेल्या अदाबद्दल स्वीकारल्या जाणाऱ्या व्याजाचा दर 12 टक्क्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली. कोरोना विषाणूंमुळे कराव्या लागणाऱ्या लॉकडाऊनवर लवकरच पॅकेज जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. माध्यामांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधताना त्यांनी आधार पॅन लिंकींगची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली.
दरम्यान, अर्थराज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जीएसटी मार्च ते मे फायलिंग रिटर्नची मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे, अश मिाहिती त्यांनी सांगितली.