मलिंगाला मिळाली विजयाची भेट

कोलंबो – अखेरचा दिन गोड व्हावा असे आपण नेहमी म्हटतो. श्रीलंकेचा अव्वल दर्जाचा द्रुतगती गोलंदाज लसिथ मलिंगा हा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी बांगलादेशविरूद्धचा पहिला सामना 91 धावांनी जिंकला आणि त्याला संस्मरणीय भेट दिली. त्यांच्या विजयास कुशल परेराने धडाकेबाज शतक टोलवित कळस चढविला.

लंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 314 धावा केल्या. परेराने केलेल्या 111 धावांचा त्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता. मुशफिकर रहीम व सब्बीर रहेमान यांनी अर्धशतके केली. तरीही त्यांचा डाव 41.4 षटकांत 223 धावांमध्ये रोखला गेला. मलिंगाने करिअरमधील अखेरचा वन-डे सामना संस्मरणीय ठरविताना बळींचे शतकही पूर्ण केले. नुवान प्रदीपनेही तीन गडी बाद करीत त्याला चांगली साथ दिली.

लंकेकडून परेराने कर्णधार दिमुथ करूणारत्ने याच्या साथीत 97 धावांची भागीदारी केली. दिमुथने दमदार 36 धावा केल्या. त्यानंतर परेराने कुशल मेंडिसच्या साथीत धावांचा वेग वाढवित 100 धावांची भागीदारी केली. परेराने 17 चौकार व एक षटकारासह 111 धावा केल्या. मेंडिसने शैलीदार 43 धावा केल्या. वरिष्ठ खेळाडू अँजेलो मॅथ्युजनेही चमकदार खेळ करीत 48 धावा जमविल्या. बांगलादेशकडून शफीउल इस्लामने तीन विकेट्‌स मिळविल्या.

लसिथ मलिंगा आंतरराष्ट्रीय कामगिरी – 226 सामने,220 डाव,101 विकेट्‌स, सर्वोत्तम 5-50

मलिंगाने बांगलादेशच्या तमिम इक्‍बाल (0) व सौम्य सरकार (15) या सलामीचे जोडीस बाद करीत हादरा दिला. पाठोपाठ मोहम्मद मिथुन (10) व मोहम्मदुल्लाह (3) हे बाद झाल्यामुळे बांगलादेशची 4 बाद 39 अशी दयनीय स्थिती होती. रहीम व रहेमान यांनी 111 धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. रहीमने 5 चौकारांसह 67 धावा केल्या तर रेहमानने 7 चौकारांसह 60 धावा केल्या. लंकेकडून मलिंगाने 38 धावांत 3 गडी बाद केले तर प्रदीपने 51 धावांत 3 विकेट्‌स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक- श्रीलंका 50 षटकांत 8 बाद 314 (कुशल परेरा 111, कुशल मेंडिस 43, अँजेलो मॅथ्युज 48, शफीउल इस्लाम 3-62, मुस्तफिझुर रहेमान 2-75)
बांगलादेश 41.4 षटकांत 223 (मुशफिकर रहीम 67, सब्बीर रहेमान 60, लसिथ मलिंगा 3-38, नुवान प्रदीप 3-51, धनंजय डीसिल्वा 2-49)

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.