लष्कर-ए-तोयबाच्या मोस्ट वॉंटेड दहशतवाद्याला सुरक्षा जवानांकडून कंठस्नान

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या सोपेरमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. दरम्यान, या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी ठार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळी सोपेरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती त्यानुसार अभियान सुरू करण्यात आले आणि त्याच चकमकीत दहशतवादी ठार झाला असल्याचे म्हटले आहे.

सोपेरमध्ये सुरक्षा जवानांच्या कामगिरीची श्रीनगर पोलिसांनी माहिती दिली. यावेळी दहशतवादाची एक क्रूर घटनेत लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉंटेड दहशतवाद्याला ठार करण्यात आले. आसिफ असे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. काही दिवसांपुर्वी आसिफने केलेल्या गोळीबारात एका फळविक्रेत्याच्या परिवारातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृति स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या वर्षीच्या पहिल्या 8 महिन्यात भारतीय लष्कराने 139 दहशतवाद्यांना ठार केले आहे. या संख्येत नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद्यांसह राज्यांतर्गत जवानांसोबत चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येचाही समावेश असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.