लष्कर ए तोयबा ही आयएसआयशी संबंधितच

नवी दिल्ली, दि. 27 – पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय तेथील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाशी संबंधित असल्याची कबूली 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड डेव्हीड कोलमन हेडली याने दिली आहे. या हल्ल्यात अमेरिकन न्यायालयाने त्याला 35 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी या प्रकरणात माफीचा साक्षिदार होता.

हेडलीने अमेरिकन आणि भारतीय अशा दोन्ही तपास यंत्रणांसमोर ही कबुली दिली आहे. त्याने म्हटले आहे की, आयएसआय आणि या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या सुचनांप्रमाणे मी काम केले आहे. योयबा ही आयएसआयच्या छत्राखालीच काम करते.

मुंबईवर 26/11 ला लष्कर ए तोयबाने हल्ला चढवला होता. त्यात कटातील सहभागाबद्दल 12 आरोपांत अमेरिकन न्यायलयाने त्याला दोषी ठरवले आहे. मात्र त्याला फाशी देणार नाही तसेच भारताकडे हस्तांतरीत करणार नाही, असा अमेरिका आणि हेडली यांच्यात करार झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.